SHREE ESTATE

Find Your Perfect Property

Reliable Sales And Rental Services For Flats, Plots, Bungalows, Shops

Explore Our Featured Properties

Discover some of our latest and most attractive properties available for sale and rent.

Plot for sale
For Sale

Plot for sale

Godoli
Price on Request
Plot
View Details
Affordable 1RK Flat in Satara
For Sale

Affordable 1RK Flat in Satara

Satara City
₹ 1,600,000 Total
Flat • 1 RK 400 Sq.Ft. Floor 1
View Details

Find The Right Property For You

Choose from our wide range of residential and commercial properties.

Your Trusted Property Partner

We help you find the right property with reliable service and professional guidance.

✓

Trusted Service

Transparent and reliable property dealing services.

★

Professional Guidance

Get professional assistance throughout your property journey.

◆

Wide Property Options

Explore flats, plots, bungalows and commercial properties.

♢

Customer Focused

We focus on your requirements and help you make the right decision.

What Our Clients Say

Hear from our clients about their experience with Shree Estate.

श
श्रीराज दिक्षीत, श्री चैतन्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.
Seller • सातारा
★★★★★

आज आमच्या मुळे आण्णांच्या दुसऱ्या पुस्तकासाठी अभिप्राय लिहायला बसलो पण खरं सांगायचं तर असं दहा ओळीत मुळे आण्णांच्या एकूण व्यावसायिक कार्याबद्दल लिहिणं केवळ अशक्य आहे. मी सिव्हील इंजिनिअरिंगला असताना मुळे आण्णांना मॉडेल डेव्हलपर्समध्ये नोकरीला होते. अगदी लहानपणापासून आम्ही मित्र असल्यामुळे त्यांना भेटायला ऑफिसवरती जायचो. त्यातूनच मला बांधकाम व्यवसायाची आवड निर्माण झाली. इंजिनिअरिंग झाल्यावर आणि माझा स्वतःचा व्यवसाय प्रारंभ केल्यावर प्रत्येक गोष्टीत मी मुळे आण्णांचा सल्ला घ्यायचो, त्यांनी मला लहान भावाप्रमाणे मार्गदर्शन केले. खरं तर कुणालाही मदत करायची म्हटल्यावर आण्णा कायम तयार असतात. साताऱ्यामध्ये इस्टेट एजंट म्हणून काम करत असताना त्यांचा प्रमाणिकपणा, विश्वास, शब्दाला पक्के असणे, सचोटी आणि प्रशासनामधील म्हणा किंवा जमीन व्यवहारातील म्हणा सखोल माहिती या गुणांच्या जोरावर साताऱ्यामध्ये तसेच पुण्यामध्ये सुद्धा नावलौकिक कमावला. मी पण बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे मला पण आण्णांसोबत बरेच व्यवहार झाले. कोणतेही कस्टमर आण्णा माझ्या प्लॉटसाठी घेऊन आले की त्यांना माहिती सांगण्याची त्यांची पद्धत केवळ अप्रतिम, जे काही असेल ते स्पष्ट सांगणार. जागेच्या व्यवहारात सांगायचे तर ज्यामध्ये आण्णा मध्यस्थ आहेत त्या व्यवहारात निर्धास्त राहायचे, म्हणजे काहीच बघावे लागत नाही. प्रिय मित्र श्रीकांत उर्फ मुळे आण्णा यांना त्यांच्या व्यवसायाच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! त्यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून जागेचे किंवा प्लॉटचे व्यवहार, अॅग्रीमेंट कशी करावी, कागदोपत्री कोणत्या गोष्टी बघायच्या, शासकीय नोंदीबद्दल माहिती अशी बरीच माहिती ग्राहकांना मिळेल.

स
सौ. निलांबरी अधिकारी, श्री. चंद्रकांत अधिकारी, दापोली.
Seller • दापोली
★★★★★

आम्ही राहतो दापोलीत, आमचा साताऱ्यातील फ्लॅट विकायचा होता. साताऱ्यातील आमचे एक स्नेही, करसुलगार कल्याण कुलकर्णी यांना आम्हाला श्रीकांत मुळे यांचा रेफरन्स दिला. मी श्री. मुळे यांना भेटलो पण आमच्याकडे फ्लॅटची काही कागदपत्रे अपूर्ण तर काही कागदपत्रे नव्हतीच. ती मिळविण्यासाठी श्री. मुळे यांनी खूप परिश्रम घेतले. अनेक अडचणींवर उपाय काढून कागदपत्रे मिळविली. त्यासाठी त्यांनी आम्हाला फक्त सातारा येथे बोलाविले. मृदू भाष्य, शांत व संयमी स्वभाव, सिनीअर सिटीझनला समजावून घेणे, घेतलेले काम कितीही अडचणी आल्या तरी पूर्ण करणे हे स्वभाव विशेष आम्हाला त्यांच्या कामात दिसून आले. सर्व अडचणींवर मात करून आमचा फ्लॅट विकला गेला. आता प्रश्न आला घरातील सामानाचा, आम्हाला तर त्यातले काहीच नको होते. अशावेळी श्री. मुळे पुन्हा मदतीला आले. मी सर्व व्यवस्था करतो म्हणाले, आणि तेही काम त्यांनी उत्तमप्रकारे केले. आम्हाला कोणताही त्रास झाला नाही. अगदी कॅपिटल गेन, टॅक्स संदर्भित आम्हाला कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीबाबत देखील त्यांनी पुढाकार घेऊन आमचे काम सुकर केले. त्यांनी आमच्यावर आणि आम्ही त्यांच्यावर ठेवला विश्वास यामुळेच हे शक्य झाले. ते आमच्या कुटुंबातीलच एक झाले आहेत. त्यांच्या कामात उत्तरोत्तर प्रगती लाभो व त्यांचे आयुष्य निरामय राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

श
श्री. महेश जोशी
Buyer • सातारा
★★★★★

श्रीकांत मुळे उर्फ आण्णा यांची ओळख माझ्या मेव्हण्यामुळे झाली. एकमेकांचे नंबर पास करण्याआधी माझ्या डोक्यात घर घेण्याचे काही नव्हते. परंतु एके दिवशी त्यांच्या what up status ला शाहूपुरी येथे घर विकणे आहे तेव्हापासून खऱ्या अर्थाने आण्णांची ओळख सुरू झाली. मी माझ्या मित्राला घर दाखविले असता त्याने कुठल्याही परिस्थितीत घर घ्यायचे म्हटले. तेव्हा आमच्या गाठीभेटी सुरू झाल्या व आमचे घर घ्यायचे ठरले. आण्णांनी सर्व गोष्टी एकदम सोप्या केल्या की मला किंवा घर मालकांना आमची कागदपत्रे व सह्या करण्याचे काम फक्त ठेवले. त्यांनी घर खरेदीच्या सर्व प्रोसेस पूर्ण केल्या. आण्णांना सर्व कागदपत्रांची पूर्ण माहिती असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाबद्दल २% देणेसाठी काही वाटले नाही. नाही म्हणायला पाणी बिलावर नाव बदलायला त्यात त्यांची जास्त ओळख नसल्यामुळे वेळ लागला. परंतु मला कुठल्याही सरकारी ऑफिसला फेऱ्या मारायला लागल्या. सर्व कागदपत्रे मुळे आण्णांनी घरपोच केली. आणि शेवटचे म्हणजे त्यांनी घरी येऊन आमच्या घराचा वाढदिवसही साजरा केला. ही आण्णांची खासियतच म्हणायची. धन्यवाद! मुळे साहेब. तुमच्यामुळे मला घर मिळाले.

Looking For Your Dream Property?

Let us help you find the perfect property according to your requirements.

Send Enquiry